प्लूटार्क
प्लूटार्क : (इ.स. सु. ४६ ?—सु. १२० ?). प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार, चरित्रकार, तत्त्वचिंतक व निबंधकार. ग्रीसमधील केरनिआ (बेओशिया) येथे जन्मला. त्याने अथेन्स येथे वक्तृत्वविद्या, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचे शिक्षण घेतले आणि नीतिशास्त्राचा अभ्यास केला.